जामनेरला पत्रकारास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

जामनेर - बातमीत नाव छापल्याचा राग आल्याने आज काही तरुणांनी पत्रकारास लाठ्याकाठ्या, रॉडने जबर मारहाण केल्याची घटना गांधी चौकात घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सामाजिक, राजकीय व  पत्रकार संघटनांनी निषेध नोंदविला आहे.

पत्रकार सय्यद लियाकतअली किफायतअली यांना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गांधी चौकामध्ये लाठया-काठ्या, रॉड व चापटांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी विलास बाबूराव हिवराळे, मोनू जाधव, युवराज खाटीक आणि त्याचा भाऊ (नांव माहीत नाही), छोटू धनगर, कचरे (नाव माहीत नाही) अशा एकूण सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुर्गा विसर्जनाच्या दिवशी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामधे काही तरुणांनी गोंधळ घालून दांगडो केला होता. याविषयी नगरसेवक बाबूराव हिवराळे यांनी फिर्याद दिली होती. या बातमीमध्ये इतरांची नावे टाकली नाही फक्त माझ्या वडिलांचेच (बाबूराव हिवराळे) नाव टाकून चाकूचा उल्लेख का केला असा जाब विलास हिवराळे याने भ्रमणध्वनीवरून पत्रकार सय्यद लियाकअली यांना विचारला. यानंतर गांधी चौकातील वर्धमान डेअरीसमोर त्यांना मारहाण केली. सर्व संशयित शहरातून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी येथे भेट दिली आणि पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांचेकडून अधिक माहिती जाणून घेतली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश काळे करीत आहेत.

पहूरला पत्रकारांचे निवेदन 
पहूर (ता. जामनेर) - बातमीत नाव छापल्याच्या क्षुल्लक कारणावरून जामनेर येथील पत्रकार सय्यद लियाकत यांना नगरसेवक पुत्रास पाच ते सहा जणांनी गांधी चौकात रविवारी सकाळी अमानुषपणे मारहाण केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्याच्या निषेधार्थ पहूरसह परिसरातील पत्रकारांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली.

पत्रकार हक्क सरक्षंण कायद्यात अंतर्गत संबंधितावर कारवाई करावी. तसेच झालेल्या प्रकार हा निंदनीय असून पत्रकारांच्या वतीने याचा निषेध करण्यात येत आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शांताराम लाठे, शरद बेलपत्रे, रवींद्र घोलप, अर्पण लोढा, गणेश पांढरे, मनोज जोशी, रवींद्र पांढरे, डॉ. संभाजी क्षीरसागर, कैलास कोळी, सतीश बिऱ्हाडे, विलास जोशी यांच्यासह पाळधी, वाकोद, तोंडापूर व पहूर येथील पत्रकार उपस्थित होते.

जिल्ह्यातील पहिला गुन्हा 
महाराष्ट्र शासनाने २०१७ मधे पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यासंदर्भात कायदा पास करून त्यांना संरक्षण दिले होते. आज (ता. २१) शहरातील झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पहिली नोंद जामनेर पोलिस ठाण्यात झाली आहे.

पत्रकारांचा तहसीलवर आज मोर्चा
शहरात पत्रकार सय्यद लियाकतअली यांना नगरसेवकाच्या पुत्रासह अनेकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ उद्या (ता. २२) सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात तालुक्‍यातील सर्व पत्रकार बांधव व इतर संघटना सहभागी होणार आहेत.

Web Title: Beating to reporter crime