Dhule News : होळीआधीच उन्हाचे चटके!

Temperature
Temperatureesakal

धुळे : होळीपूर्वीच शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून दुपारच्या सत्रात उन्हाचे (Summer) चटके सोसावे लागत आहेत. होळीनंतर पारा पस्तिशी ओलांडतो. (before Holi city has been suffering from scorching sun during afternoon session for few days dhule news)

मात्र, यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. आता कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. परिणामी दुपारच्या सत्रात तीव्र उष्मा राहतो. उन्हाच्या काहिलीने शहरवासीयांचा जीव कासावीस होत आहे.

शहराच्या किमान तापमानात घसरण सुरूच आहे. दिवसाचे कमाल तापमान वाढल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ होईल. पारा चाळिशीपुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Temperature
Railway Ticket Office : सेंट्रल रेल्वेकडे NMCची 27 लाखांची थकबाकी! तिकीट कार्यालय हलविण्याची तयारी

वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके हे वाढत्या तापमानाचेच संकेत आहे. यंदा उन्हाळ्याच्या पंधरा दिवस आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

Temperature
Citylinc Electric Bus : ‘सिटीलिंक’ घेणार 25 इलेक्ट्रीक बस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com