Dhule Agriculture News : पपई फळाची पूजा करून हंगामाची सुरवात; कलमाडी येथे पहिली तोडणी

Abhijit Patil, President of Nandurbar District Banana, Papaya Fruit Growers Association, started this year's papaya season by worshiping papaya.
Abhijit Patil, President of Nandurbar District Banana, Papaya Fruit Growers Association, started this year's papaya season by worshiping papaya.esakal

Dhule Agriculture News : यंदाच्या पपई हंगामातील पहिली तोडणी कलमाडी (ता. शहादा) येथील पपई उत्पादक शेतकरी संदीप पाटील यांच्या शेतात नंदुरबार जिल्हा केळी पपई फळबागायतदार संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते पपई फळाची पूजा करून करण्यात आली.

या वेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात चर्चा करून मुहूर्ताचा भाव २५ रुपये ११ पैसे प्रतिकिलो ठरविण्यात आला. ( Beginning of season by worshiping papaya fruit dhule agriculture news)

जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. एकट्या शहादा तालुक्यात चार हजार ३०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यात बहुतांश क्षेत्रांत विविध आजारांमुळे पपईच्या झाडावर फळांची संख्या नगण्य आहे. मोजकेच पपईचे क्षेत्र चांगले आहे.

निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे यंदा पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळणे अशक्य असल्याने पपईला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २०२३-२४ या नवीन पपई हंगामाच्या मुहूर्त कलमाडी येथील शेतकरी संदीप पाटील यांच्या शेतात विधिवत पूजा करून करण्यात आले.

या वेळी नंदुरबार जिल्हा केळी पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून शेतकरी व व्यापारी यांच्यात चर्चा करत २५ रुपये ११ पैसे याप्रमाणे मुहूर्ताचा दर ठरवण्यात आला. या वेळी व्यापारी दिलीप माळी यांनी या दराने पपई खरेदी केली. सुरवातीचा तोडणीत माल कमी निघत असल्याने शेतकरी व व्यापारी दोघांनाही परवडणारा दर ठरविण्यात आला.

Abhijit Patil, President of Nandurbar District Banana, Papaya Fruit Growers Association, started this year's papaya season by worshiping papaya.
Dhule Agriculture News : तेल्यामुक्त डाळिंबबागेसाठी प्रत्येक फळास पेपर रॅपिंग; शेतकऱ्यांची धडपड

या वेळी बागायतदार संघाचे संचालक डॉ. आनंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील, जगदीश पाटील, कपिल पाटील, सत्यानंद पाटील आदींसह कलमाडी येथील शेतकरी दीपक चौधरी, प्रशांत पाटील, तऱ्हाडीचे दीपक पाटील, संदीप पाटील, जावदे येथील कन्हय्या पाटील, सोनवदचे वकील पाटील, अरुण पाटील, सुनील पाटील, वेळावद, काथरदासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

''सध्या पपईची उत्पादकता कमी असल्यामुळे हा मुहूर्त भाव ठरविण्यात आला आहे. या वर्षीदेखील पपईचा भाव ठरविण्यासाठी केळी पपई बागातदार संस्था, शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय साधणार व ठरविलेला भाव वेळोवेळी सार्वजनिक करणार.''-अभिजित पाटील, अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा केळी, पपई बागायतदार संस्था

Abhijit Patil, President of Nandurbar District Banana, Papaya Fruit Growers Association, started this year's papaya season by worshiping papaya.
Dhule Agriculture News : केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com