नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्कार

संजीव निकम
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नांदगाव : डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराअंतर्गत यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालयाचा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार नांदगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी देखील अशा प्रकारचा पुरस्कार मिळविणारे नांदगावचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यातले पहिले आदर्श रुग्णालय ठरले आहे.

रुग्णालयातील अधिपरिचारिका मीना जाधव यांना जिल्ह्यातील फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या सर्वप्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जाधव या जिल्ह्यातल्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारे नांदगावचे रुग्णालय सर्वच बाबतीत लोकाभिमुख ठरले आहे.

खासगी इस्पितळात मिळणाऱ्या सेवेपेक्षा दर्जेदार सेवा पुरविण्यात येत असल्याने बाह्य व आंतर विभागात दैनंदिन रुग्णांची गर्दी या ठिकाणी होत असते आज नाशिकला एद्गः मैदानात अस्मिता मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते सभापती मनीषा पवार अर्पण खोसकर सुनिता चारोस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर व्ही एम होले यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहन बोरसे, डॉक्टर प्रशांत जुन्नरे, अधिपरिचारिका मीना जाधव व त्यांच्या टीमने हे पुरस्कार स्वीकारले आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार अनिल आहेर, नगराध्यक्ष राजेश कवडे, तालुका पंचायत समितीच्या सभापती सुमनताई  निकम आदींनी ग्रामीण रुग्णालयाच्या टीमचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. 
 
Web Title: Best Rural Hospital Award for Sub-District Hospital Nandgaon