कचरा वर्गीकरणातून भडगाव पालिकेने मिळविले ३७ हजार रुपये

सुधाकर पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

भडगाव : एरवी साठून राहणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिकेने चार महिन्यांत 37 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. अशा प्रकारचे उत्पन्न मिळविणारी भडगाव पालिका ही नाशिक विभागातील एकमेव आहे. शासनानेही या कामाबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे. 

शहरात स्वच्छता मोहिमेने जोर धरला आहे. रोज घंटा गाडीच्या माध्यमातून शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जातो. रोज अंदाजे 10 टनांपेक्षा अधिक कचरा गोळा केला जातो. 

भडगाव : एरवी साठून राहणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिकेने चार महिन्यांत 37 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. अशा प्रकारचे उत्पन्न मिळविणारी भडगाव पालिका ही नाशिक विभागातील एकमेव आहे. शासनानेही या कामाबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे. 

शहरात स्वच्छता मोहिमेने जोर धरला आहे. रोज घंटा गाडीच्या माध्यमातून शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जातो. रोज अंदाजे 10 टनांपेक्षा अधिक कचरा गोळा केला जातो. 

चार महिन्यांत 37 हजारांचे उत्पन्न 
भडगाव पालिकेने गेल्या चार महिन्यांपासून कचरा संकलन सुरू केले आहे. गोळा करतानाच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. सुक्‍या कचऱ्यामध्ये गोळा झालेले प्लॅस्टिक, रद्दी, पुठ्ठे, भंगार यांचे वर्गीकरण केले जाते. दर महिन्याला त्याची विक्री केली जाते. त्यातून पालिकेला आतापर्यंत 37 हजार 296 रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

कंपोस्ट खताचेही चार युनिट्‌स 
पालिका प्रशासनाने ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताच्या निर्मितीचे चार युनिट्‌स सुरू केले आहेत. बीएसएनएल कार्यालय, टोणगाव, पेठ, यशवंतनगर भागांत ही केंद्रे आहेत. या निर्मितीचे काम बचत गटांना देण्यात आले आहे. चारही युनिट्‌स मिळून साधारणत: आठ टन कंपोस्ट खताची निर्मिती होणार आहे. येथे तयार झालेले खत प्रमाणित करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ते प्रमाणित झाल्यानंतर या खताची विक्री केली जाईल. 

दररोज 10 टन कच-याचे संकलन 
शहरातुन दररोज साधारणपणे सर्व 10 टन कचरा संकलीत केला जातो. वास्तविक अगोदर एवढ्या प्रमाणात हा कचरा असाच पडुन राहायचा. त्यामुळे कच-यापासुन उत्पादनाचा प्रश्नच नाही. मात्र आता शहर चकाचक दिसायला लागले आहे. एवढेच नाही तर या कच-यापासुन चक्क उत्पन्न मिळयला लागले आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेकडुन समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक विगागातील उत्पन्न घेणारी एकमेव पालिका 
कच-याच्या वर्गिकरणातुन उत्पन्न घेणारी भडगाव पालिका ही नाशिक विगातील एकमेव पालिका ठरली आहे. इतर पालिकामंधे सर्व कचरा हा डंपिग ग्राउंड वर टाकला जातो. तेथुन भंगार, प्लॉस्टीकचे घेणारे दुकानदार त्याचे वर्गिकरण करून तो कचरा घेऊन जातात. त्यामुळे पालिकेला उत्पन्न मिळत नाही. मात्र भडगाव पालिका स्वतः च कच-याचे वर्गीकरण करू न रद्दी, प्लॉस्टीक, पुठ्ठे, भंगार, काच ची विक्री करते. त्यामुळे भडगाव पालिकेचे प्रशासनाने कौतुक केले. 

कचरा संकलनातुन संकलित झालेल्या प्लॉस्टीक, रद्दी, पुठ्ठे, काच विक्रीतुन चार महीन्यात जवळपास 37 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. दर महीन्याला या संकलित कच-याचा लिलाव केला जातो. 
- राहूल पाटील मुख्याधिकारी भडगाव 

शहर स्वच्छतेचा आपले प्राधान्य आहे. दररोज घंटागाडीच्या माध्यमाने कचरा संकलीत केला जातो. या कच-यापासुन कंपोस्ट खताची ही निर्मिती केली जात. त्यामाध्यमाने बचत गटांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 
- राजेंद्र पाटील नगरध्यक्ष भडगाव 

महिना........मिळालेले उत्पन्न 
जानेवारी......12682 
फेब्रुवारी.........8002 
मार्च..............8572 
एप्रिल............8040 

Web Title: Bhadgaon Palika receives 37 thousand from garbage sorting