मतदारयादीत "गोलमाल है.. भाई'

भूषण श्रीखंडे
बुधवार, 13 जून 2018

मतदारयादीत "गोलमाल है.. भाई'

जळगाव  : जळगाव महापालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशा "राजकीय' हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभागरचना "बंगल्या'वर बसून झाल्याचा आरोप झाला. त्यात मतदारयादीतील घोळाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. पाच जूनला जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयाद्याही अभियंत्यांनी घरी बसून तयार केल्याचा आरोप होत आहे. यादीतील घोळाचे प्रकरण थेट पोलिस ठाण्याच्या मार्गावर असताना प्रभागरचना असो की यादी.. पालिकेत सर्वच "गोलमाल है भाई.. सब गोलमाल है' अशी स्थिती आहे. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे पाच-सहा महिने आधीच निवडणुकीची धुळवड उडणे स्वाभाविक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडून देखील पूर्वतयारी सुरू आहे. सुरवातीला प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. प्रभागरचनेवर आलेल्या हरकती व तक्रारीवरून सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर दोन-तीन प्रभागात किरकोळ बदल झाले. परंतु, ही रचना जैनांच्या निवासस्थानावर बसून केल्याच्या आरोपाने वातावरण ढवळून निघाले. थेट आयोगापर्यंत तक्रारी झाल्या. 
प्रभागरचनेनंतर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या पाच जूनला प्रसिद्ध केल्या. या मतदार याद्यांमध्ये देखील घोळ झाला असून, महापालिकेच्या अभियंत्यांनी घरी बसून मतदार याद्या बनविल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना घेरून केला. या मतदार याद्या तयार करण्यामध्ये देखील "राजकीय' हस्तक्षेप झाला असल्याचा बोलले जात आहे. तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. त्यावर मलमपट्टी म्हणून महापालिका प्रशासनाने एसएमस आलेले पण पुरवणी यादीत नाव न आलेल्यांची नावे समाविष्ट करण्याचे, प्रभागाच्या यादीत नाव येता दुसऱ्या यादीत नाव गेलेल्या मतदारांचे नाव पुन्हा त्या यादीत टाकण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, एवढ्यावर भागणार नाही. कारण सर्व याद्यांमध्येच "गोलमाल' असेल तर त्यावरील हरकती, तक्रारींचा निपटारा कसा होणार? हाच खरा प्रश्‍न आहे. 

यादीचा दर अव्वाच्या सव्वा 
यादीचा दरही राजकीय कार्यकर्त्यांना घाम फोडणारा आहे. प्रतिपान 13 रुपये यानुसार विविध प्रभागनिहाय 6 ते 16 हजारांपर्यंत यादीची किंमत आहे. यादीवरच एवढा खर्च करायचा तर निवडणुकीत काय करायचे? असा प्रश्‍न इच्छुकांसमोर आहे. मात्र, या याद्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याने त्या घरबसल्या डाऊनलोड करून स्वस्तात प्रिंट काढून घेण्याचा पर्याय इच्छुकांसमोर आहे. 
 
Web Title: bhaee