शालेय मुलीचा उष्माघाताने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सोग्रस - वडाळी भोई (ता. चांदवड) येथील भगवती नारायण घाटे (वय 17) या शालेय मुलीचा भरउन्हात चक्कर येऊन पडल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. भगवतीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती.

सोग्रस - वडाळी भोई (ता. चांदवड) येथील भगवती नारायण घाटे (वय 17) या शालेय मुलीचा भरउन्हात चक्कर येऊन पडल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. भगवतीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती.

शाळेला सुट्या असल्याने ती गुरुवारी (ता. 26) दुपारी शेतातील घराजवळच काम करत होती. त्या वेळी तीव्र उन्हामुळे तिला चक्कर आली. तिला तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला नाशिकला हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना आज सायंकाळी तिचा मृत्यू झाला. वडाळी भोई येथील उपसरपंच निवृत्तीआप्पा घाटे यांची ती पुतणी होत.

Web Title: bhagwati ghate death by sunstroke