yeola
yeola

सरकारकडून भुजबळाना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी

येवला - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनर भुजबळ यांना आलेलले धमकीचे पत्र म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करवी व भुजबळाना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी अशी मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेस व राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. आज सकाळी येथील तहसील कार्यालयात सर्व समर्थकांनी जमून तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन दिले. 

काल भुजबळाना मनुस्‍मृतीस विरोध करीत राहील्‍यास दाभोळकर, पानसरे यांच्‍या प्रमाणे तुमचीही हत्‍या करण्‍यात येईल, अशी धमकी दिली. वास्तविक भुजबळ हे राष्‍ट्रीय नेते असुन देशाच्‍या व राज्‍याच्‍या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. बहुजनांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी ते नेहमीच लढत असतात. समता परिषदेच्‍या माध्‍यमातुन ते देशपातळीवर सर्वमान्‍य ओबीसींचे नेते आहेत. अशा परिस्थितीत विघातक प्रवृत्‍तीचे लोक निनावी पत्र पाठवून समाजात अशांतता पसरविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. या पत्रामुळे भुजबळ यांच्‍या जिवीत्‍वास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे शासनाने झेड प्‍लस सुरक्षा पुरवावी. भविष्‍यात भुजळाना कोणत्‍याही प्रकारची इजा झाल्‍यास त्‍यास शासन जबाबदारी राहील. या धमकीमुळे कार्यकर्त्‍यांच्‍या भावना तिव्र झालेल्‍या असुन यांचा उद्रेक होण्‍याअगोदर वेळीच आरोपींना अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्‍यात आली आहे.

यावेळी बाजार समितीच्या सभापती जेष्‍ठ नेत्‍या उषाताई शिंदे, अरुणमामा थोरात, बाळासाहेब लोखंडे, तालुकाध्‍यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, वसंत पवार, युवकचे तालुकाध्‍यक्ष मोहन शेलार, संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वाघ, अकबर शाह, डॉ. संकेत शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, गणपत कांदळकर, सचिन कळमकर, देवीदास शेळके, भुषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, अलका जेजुरकर, विमल शाह, निसार निंबुवाले, विजय जेजुरकर, तुळशीराम कोकाटे, दिपक देशमुख, विजय खोकले, ज्ञानेश्‍वर शेवाळे, रवी जगताप, प्रितम शहारे, विष्‍णूपंत क-हेकर, गोटु मांजरे, साहेबराव आहेर, अशोक मेगाणे, अंबादास शिनगर, सचिन सोनवणे, गोरख काळे, भाऊसाहेब कळसकर अदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com