भुजबळांना जामीन मिळाल्याने नांदगावात जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला.

नांदगाव : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. आमदार पंकज भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भुजबळांचे शेकडो समर्थक जमले आणि त्यांनी भुजबळांच्या नावाचा जयजयकार केला. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी अखेर भुजबळांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली. काही महिने आधी शनि मंदिरासमोरच्या बागेत भुजबळांना जामीन मिळावा, यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यासाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना, माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस व सामजिक संघटनांनी एकमुखी आवाज उठवला होता. याची आठवण गुप्ता यांनी केली. न्यायाच्या नावाखाली अन्यायच सुरु होता. ते जामिनावर सुटले. भविष्यात निर्दोष सुटतील. कारण मंत्रिमंडळातील निर्णय सामुदायिक असतात. कोणा एकट्यावर त्याची जबाबदारी करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी दिली. 

Web Title: Bhujbal gets bail peoples enjoying in Nandgaon