भुसावळमध्ये सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी रोखला महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

भुसावळ : निंभोरा-पिंप्रीसेकम (ता. भुसावळ) ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनवणे (वय 61) यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसातला उघडकीस आली. फेकरी उड्डाणपुलाच्या खांबाजवळ मृतदेह आढळुन आला, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी साडेआठ पासून रास्ता रोको केला आणि संशयित आरोपींना अटक करीत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर रोखून धरला.

आज सकाळी अचानक घडलेल्या प्रकाराने पोलीस प्रशासनाची धांदल उडाली, भुसावळच्या तीन पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा पाच किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. सरपंच शालिक सोनू सोनवणे हे 15 जूनपासून घरातून बेपत्ता झाले होते व याबाबत तालुका पोलिसात हरवल्याची नोंद आहे.

आधी आज सकाळी हत्या झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. अंगावरील कपडयांवरून सरपंच शालिक सोनवणे यांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी रास्ता रोको केला. 

Web Title: bhusawal news crime sarpanch murder

टॅग्स