#motivational शेवटी भूषणने स्वप्नांना सत्यात उतरवलेच...

bhushan pathade.jpg
bhushan pathade.jpg

मालेगाव : घराचा आधार असलेल्या बापानंतर आलेल्या जबाबदारीत आईची ससेहोलपट होते. अशा परिस्थितीत आई व आजीच्या संघर्षाची जाणीव ठेवत त्यांच्या स्वप्नांना साकार करत मालेगावच्या भूषण पठाडे याने जलसंधारण अधिकारी पदाला गवसणी घातली. लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षा देत पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या 'जलसंधारण अधिकारी' या पदावर नियुक्ती झाली. राज्यातील ७९ जणांची निवड झाली असून यात ४० रॅंकने भुषण उत्तीर्ण झाला आहे.

आजी व आईच्या गरूड भरारीचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते
महसूल खात्यात तलाठी असलेल्या आपल्या वडिलांच्या (बाबुलाल पठाडे) यांच्या जाण्याने पठाडे परिवार पोरका झाला. सातवी पास असलेल्या आई वैशाली यांनी मुले लहान असल्याने जवळ असलेल्या थोड्या शेतीत कष्ट केले.
 यानंतर त्यांची महसूल खात्यात कर्मचारी म्हणुन नियुक्ती झाल्याने संसाराची गाडी रूळावर आली. लेकरांना शिक्षण दिले.आपणही दहावीची परीक्षा दिली तर पदोन्नती मिळेल.या जिद्दीने लिपिक पदी नियुक्ती झाली.

 ४० व्या रॅंकने भुषण उत्तीर्ण
दोन मुलींच्या विवाहानंतर मुलांकडे लक्ष केंद्रित करत सासु लंकाबाई पठाडे यांच्या पाठबळाने बी.ई.सिव्हील पदवी भुषणने संपादन केली.दरम्यान कंत्राटी पद्धतीने जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदावर काम करत अनुभव घेतला. आजी व आईच्या गरूड भरारीचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे, हैदराबाद गाठले. लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षा देत पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या 'जलसंधारण अधिकारी' या पदावर नियुक्ती झाली. राज्यातील ७९ जणांची निवड झाली असून यात ४० रॅंकने भुषण उत्तीर्ण झाला आहे.

कुटुंबाचा पाठिंबा

भूषणचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालेगावात ल.रा.काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात झाले. पदवीका केबीएच पॉलिटेक्निकमधुन झाली.
अभियांत्रिकी शिक्षण औरंगाबाद येथील नेहरू इंजिनिअरींग कॉलेजात घेतले.यशाची भरारी अधिक उंच घेत भुषणला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कौल मिळवायचा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दोन बहिणी उच्च शिक्षित असुन लहान पंकज हा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.

प्रतिक्रिया

कुटुंबातील आजी,आई यांचा संघर्ष पाहिलेला होता.या जाणीवेने जबाबदारीचे भान ठेवून अभ्यासात सातत्य ठेवले.ध्येय निश्चित करत 'मला अधिकारी व्हायचंय' हाच ठाम निर्धार केला. - भुषण पठाडे, जलसंधारण अधिकारी, साक्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com