हजेरीप्रसंगी ‘येस सर’ म्हणायचा जमाना गेला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

जळगाव - काल-परवापर्यंत वर्गातच विद्यार्थ्यांची नावे उच्चारल्यानंतर ‘येस सर किंवा मॅडम’, ‘हजर’ असा प्रतिसाद देत हजेरी घेण्याचे दिवस आता सरलेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थी जसे ‘स्मार्ट’ होताय, तशा शाळाही अपडेट होऊ लागल्या असून याअंतर्गत विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानभाग विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी ‘बायोमेट्रिक’ यंत्र कार्यान्वीत करण्यात आले आहेत.

जळगाव - काल-परवापर्यंत वर्गातच विद्यार्थ्यांची नावे उच्चारल्यानंतर ‘येस सर किंवा मॅडम’, ‘हजर’ असा प्रतिसाद देत हजेरी घेण्याचे दिवस आता सरलेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थी जसे ‘स्मार्ट’ होताय, तशा शाळाही अपडेट होऊ लागल्या असून याअंतर्गत विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानभाग विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी ‘बायोमेट्रिक’ यंत्र कार्यान्वीत करण्यात आले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शाळांमध्ये आता पहिलीपासून संगणक शिक्षण अनिवार्य झाले आहे. शहरी भागातील शाळा तर त्याही पुढे जाऊन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिकच विकसित झाल्या आहेत. अनेक शाळांमधील दैनंदिन कामकाज ‘पेपरलेस’ झाले आहे, तर अन्य कामांमध्येही तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. बालवयातच विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आल्यानंतर मुलं स्मार्ट होऊ लागली, तशा शाळाही ‘स्मार्ट’ होत आहेत.

डिजिटल ओळखपत्रांची क्रेझ
दोन दशकापूर्वी शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक, प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर पासपोर्ट फोटो व पेनने लिहिलेली माहिती असायची. या ओळखपत्रांची जागा डिजिटल ओळखपत्रांनी घेतली. नंतर या डिजिटल ओळखपत्रांचे स्वरुपही बदलत गेले. गळ्यात अडकवायच्या लेससह, बेल्टला लावायची ओळखपत्रे दिसू लागली. दरवर्षी या ओळखपत्रांचे स्वरुपही बदलत आहे.

बायोमेट्रिक हजेरी
वर्गावर्गात विद्यार्थ्यांची हजेरी होण्याचे दिवसही आता सरले आहेत. विद्यार्थ्याचे नाव उच्चारल्यानंतर ‘येस सर’, ‘येस मॅम’ म्हणायची पद्धत बाद होत आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या सावखेडा येथील शानभाग विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा नुकतीच कार्यान्वीत करण्यात आली. १५०० विद्यार्थ्यांसाठी शाळेत ४ मशिन्स लावण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी स्वतंत्र पाचवे मशिन आहे. प्रार्थना झाल्यानंतर शाळेत येणारे विद्यार्थी रांगेने उभे राहतात व बायोमेट्रिक मशिनवर ‘थम्ब’ करुन वर्गात जातात.

तंत्रज्ञानातील बदल शाळाही स्वीकारु लागल्या आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शानभाग विद्यालय अग्रेसर आहे, त्यामुळे शाळेला केंद्र शासनाकडून ‘अटल टिंकरिंग लॅब’ नुकतीच मंजूर झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी आधुनिक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वीत केली असून त्यामुळे हजेरीचे काम सोपे झाले आहे.
- ज्ञानेश्‍वर पाटील, प्राचार्य. 

Web Title: biometric punching in school