ज्ञानदेवी विद्यालयात वृक्षांचा वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी

रोशन खैरनार
गुरुवार, 12 जुलै 2018

ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार (ता. 12) ला शाळेच्या आवारातील विविध वृक्षांचा वाढदिवस साजरा करीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. विठ्ठल, रखुमाई व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.

सटाणा - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित व आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार (ता. 12) ला शाळेच्या आवारातील विविध वृक्षांचा वाढदिवस साजरा करीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. विठ्ठल, रखुमाई व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.

शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेंतर्गत काढण्यात आलेल्या दिंडीचा प्रारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. दिंडीत पर्यावरण रक्षण व संवर्धन जनजागृतीपर विविध घोषणा देत विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी वारकरी व विठू - रखुमाईची वेशभूषा करीत नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संगोपनाविषयी जनजागृती केली. दिंडीचा समारोपानंतर शाळेच्या आवारात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आवारात वृक्षारोपण नाव तयार करून वृक्ष लागवडीचा संदेश दिला.

दरम्यान, शाळेच्या आवारात विद्यार्थी व शिक्षकांनी गेल्या वर्षी लावलेल्या आंबा, गुलमोहोर, शिसव, धामडा, सीताफळ या विविध जातीच्या वृक्षांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव व हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण व वृक्षांचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाजन चंद्रशेखर, पी. सी. मोरे, संगीता वाणी, अरुणा ठाकरे, जयश्री वणीस, तीर्थराज खैरनार, चेतन दाणी, सुनिल निकुंभ, राहुल जाधव, विकास मानकर, संजय गर्दे, मनोहर खैरनार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The birthday celebrated of trees in the Gyanadevi school satana