Dhule News : भामरे यांच्याविरूद्ध भाजपसह रावल समर्थक आमने-सामने

Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar
Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar eskal

Dhule News : मेथी (ता. शिंदखेडा) गटातील विकास कामे होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी जिल्हा परिषदेसह भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (BJP along with supporters of MLA Jaykumar Rawal criticized Bhamre as hypocrite On resignation dhule news)

तो विहित नमुन्यात नसल्याने श्री. भामरे यांचे ते ढोंग असल्याची टीका आमदार जयकुमार रावल समर्थकांसह भाजपने केली होती. यानंतर त्यांना अपेक्षित पद्धतीने भामरे यांनी राजीनामा दिला आहे. तो मंजूर झाल्यानंतर कर्ले, परसुळे (ता. धुळे) येथे भाजपसह रावल समर्थकांनी जल्लोष केला.

भाजपचे नेते आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी श्री. भामरे यांनी प्रथम दिलेला राजीनामा योग्य, विहित नमुन्यात नसल्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे श्री. भामरे यांनी विरोधकांना अपेक्षित अशा तरतुदीनुसार राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अश्‍विनी पवार, सदस्य भीमराव ईशी, आशुतोष पाटील यांच्या समक्ष राजीनामा दिल्याचे श्री. भामरे यांनी सांगितले.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये आतषबाजीतून आनंद व्यक्त केला. यासंदर्भात श्री. भामरे यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेत मी सांगितलेली विकास कामे करायची नाहीत, अशी सूचना आमदार रावल यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट होते, असा आरोप आहे. यातून मेथी गटातील गावे आमदार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar
NMC Water Management: शनिवारी शहराचा पाणी पुरवठा बंद! अल निनोच्या पार्श्‍वभूमीवर पाणी कपातीचेही नियोजन

या गावांचा विकास रोखून आमदार रावल यांनी त्यांना मते देणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. त्यामुळे विकास कामाबाबत बोलण्याचा आमदार रावल यांना नैतिक अधिकार नाही. भविष्यात मते मागताना तालुक्यातील मतदार आमदार रावल यांच्यासह भाजपला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.

शिंदखेडा तालुक्यातील आणखी काही जिल्हा परिषद सदस्यांची विकास कामे रोखण्यात आलेली आहेत. ही हुकूमशाही म्हणावी लागेल, असे सांगत जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, त्याचे त्यांना काही घेणे देणे नाही. तसेच अनेक सरपंचांवर काही कारणातून दबाव आणला जातो, असाही आरोप श्री. भामरे यांनी केला आहे.

कोळी यांचे पत्रक

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस गोपाल कोळी यांनी श्री. भामरे यांच्या राजीनामाच्या समर्थनार्थ म्हटले आहे, श्री. भामरे हे कधीही नाटक किंवा षडयंत्र करीत नाहीत. ते भाजपकडून केले जाते. भामरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश खैरनार यांनी मांडळ येथे जल्लोष करीत पत्रक काढले होते.

त्यांना श्री. भामरे यांच्या नावाची इतकी भीती का आहे की विरोधकांना जल्लोष करावा लागतो? विरोधकांसह आमदारांकडून श्री. भामरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कशी मिळणार नाही यासाठी प्रयत्न होत आहेत.

Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar
Metro Neo : नाशिक मेट्रो निओचा प्रवास खडतर! 10 किलोमीटर पायलट प्रोजेक्टसाठी नवा प्रस्ताव

भामरे यांना आव्हान

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी हिंमत असेल तर श्री. भामरे यांनी पुन्हा मेथी गटात निवडून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. मेथी गट हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या गटातील गावांमध्ये भाजपचे सरपंच आहेत. याठिकाणी सत्तेनंतर विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला गेला आहे. या ठिकाणी आमदार रावल यांनी दिलेला उमेदवार निवडून येतो.

श्री. भामरे हे राष्ट्रवादीमध्ये असताना सलग चार वेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी राजकीय पुनर्वसनासाठी आमदार रावल यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करेल या बोलीवर मेथी गटातून उमेदवारी मिळविली. विजयानंतर ते बदलले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार होता, असे श्री. वारुळे यांनी म्हटले आहे.

कर्ले, परसुळेत जल्लोष

श्री. भामरे यांनी विहित नमुन्यात राजीनामा दिल्यावर व तो सोमवारी मंजूर झाल्यानंतर कर्ले व परसुळे येथे भाजपकडून जल्लोष झाला. यासंदर्भात रावल गटाने सांगितले, की भारतीय जनता पक्षातर्फे मेथी गटातून श्री. भामरे निवडून आले. त्यांनी विहित नमुन्यात राजीनामा दिला नव्हता. त्यानुसार तो मंजुरीनंतर मेथी गटातील कर्लेत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला.

Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar
NMC News : घनकचरा विभागाची स्वच्छ सर्वेक्षणात कसोटी; महापालिकेकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

माजी सरपंच दगाजी देवरे, उपसरपंच गोकुळ बेडसे, रावसाहेब शिंदे, विक्रम बेडसे, रमेश मोरे, पंडित वाघ आदी उपस्थित होते. परसुळे येथे उपसरपंच कपिल सोनवणे, संदीप पाटील, मनोज पाटील, संजय पाटील, मायाबाई सोनवणे, सुनीताबाई भिल, एम. एस. पाटील,

दादाभाऊ सोनवणे, योगराज पाटील, बापू पाटील, सयाजी पाटील, गोरख सोनवणे, मनोज जाधव, अनिल पाटील, राजू सोनवणे, बापू पाटील, शिवाजी पाटील, रावसाहेब पाटील, भिका सोनवणे, नाना पवार आदी उपस्थित होते. भाजपकडे पाहून श्री. भामरे यांना मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली, असे माजी सरपंच दगाजी देवरे म्हणाले

Dyaneshwar Bhamre handing over his resignation to Zilla Parishad President Ashwini Pawar
NMC News : जलसंपदा विभागाकडून महापालिकेची कोंडी; उजव्या कालव्याचे भाडे व अतिक्रमण काढण्यासाठी पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com