भाजप सरकार शेतकरी विरोधी - आमदार पाडवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नंदुरबार - भाजपचे सरकार उद्योजकधार्जिणी असून शेतकरी विरोधी आहे. उद्योजकांचे एक लाख करोड रूपयांचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी केलेला नाही. उलट नोटबंदी करुन शेतकऱ्यांचे हाल करीत आहेत. असे मत आमदार ॲड के.सी. पाडवी यांनी  व्यक्त केले.

नंदुरबार - भाजपचे सरकार उद्योजकधार्जिणी असून शेतकरी विरोधी आहे. उद्योजकांचे एक लाख करोड रूपयांचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी केलेला नाही. उलट नोटबंदी करुन शेतकऱ्यांचे हाल करीत आहेत. असे मत आमदार ॲड के.सी. पाडवी यांनी  व्यक्त केले.

असली (ता. धडगाव) येथे अक्कलुवा व धडगाव तालुक्‍यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष जामसिंग पराडके, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रवींद्र पाडवी, धडगाव तालुकाध्यक्ष रेंहज्या पावरा, धडगाव पंचायत समितीचे सभापती काळूसिंग पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती बिज्या वसावे, जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम पाडवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती हिराबाई पाडवी, महिला बालकल्याण सभापती लताबाई पाडवी, जिल्हा परिषद सदस्या जमुना पाडवी, नटवर पाडवी, बुटीबाई पाडवी, योगिता वळवी, सीताराम राऊत, निशा वळवी, धडगावच्या नगराध्यक्षा अहिल्याबाई पावरा, उपनगराध्यक्ष मतीन कुरेशी, हारसिंग पावरा, विजयाबाई पावरा, भीमसिंग पराडके, आदी उपस्थित होते. 
आमदार पाडवी म्हणाले, शासनाने स्मार्टसिटीच्या नावाखाली ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. उद्योग-व्यावसायिकांना पोसण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्मार्ट सिटीची फंडा अजमावत आहेत. नोटबंदीचा परिणाम ग्रामीण भागात अधिक झाला. त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना आज आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी, कष्टकरींचा श्रमाचा व हक्काचा पैसा असून तो काढता येत नाही. त्यावर बंधने घातली आहेत.

मजुरांना मजूरी देण्यासाठी पैसा नसल्याने मजुरांना काम मिळत नाही तर शेतकऱ्यांची कामे ठप्प पडली आहेत. नर्मदा नदीवरील जलोला प्रकल्पामुळे आदिवासी शेतकऱ्यांची जमिन व घरे बुडीत क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे आदिवासींची संस्कृतीचा ऱ्हास होईल. सरपंचांनी ग्रामीण भागाचा विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाचा लाभ घ्यावा. 

यावेळी धडगाव व अक्कलकुवा तालुक्‍यातील ७४ नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांचा आमदार पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाडवी यांची नुकतीच काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सुनील पाडवी यांनी सूत्रसंचालन केले, सी. के. पाडवी यांनी आभार मानले.

Web Title: bjp government farmer oppose