भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

bjp
bjp

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी शासनाने त्वरित निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लीला मोहन सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

2008 मध्ये मंजूर झालेले जैताणे ग्रामीण रुग्णालय केवळ जागेच्या वादामुळे रखडले होते. परंतु जैताणे ग्रामपंचायतीने दिलेल्या खारीखाणमधील पाच एकर जागेला शासनाने नुकतीच अंतिम मंजुरी दिली आहे. माळमाथा परिसराची लोकसंख्या साधारण दोन लाखाच्या घरात असून त्वरित निधी मंजूर केल्यास ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसह पायाभूत वैद्यकीय सुविधांची निर्मितीही करता येईल व निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील रुग्णांची गैरसोयही दूर होईल, असेही लीला सूर्यवंशी यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com