सरपंचपदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची काँग्रेसला मदत 

सरपंचपदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची काँग्रेसला मदत 

निजामपूर-जैताणे (धुळे ) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार जाकीर तांबोळी यांनी केला आहे. काल झालेल्या विशेष सभेत सलीम पठाण यांनी अवघ्या एका मताने निसटता विजय मिळवला. एरवी हिंदुत्व व पक्षनिष्ठेच्या गोष्टी करणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, असा टोलाही तांबोळी यांनी 'सकाळ'शी बोलताना लगावला.

सलीम पठाण हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून शिवाजी दहिते यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांनी सरपंच पठाण हे परिवर्तन पॅनलचे सर्वपक्षीय उमेदवार असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड.शरदचंद्र शाह यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांच्या दुहेरी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. येथून पुढे अशा कार्यकर्त्यांनी आपल्या नावाचा उपयोग करून राजकारण करणे बंद करावे, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी, साधना राणे, अनिता मोहने, मालुबाई शिरसाठ, इंदुबाई भिल, कासुबाई भिल, सुनील बागले आदी आठ सदस्यांनी जाकीर तांबोळी यांना जाहीर पाठिंबा दिला होता. एका सदस्याने आमिषाला बळी पडून ऐनवेळी दगाबाजी केल्यामुळे आम्हाला यशाने हुलकावणी दिली. राजकारणात नवखे असूनही आम्ही दिग्गजांना उरूनपुरुन निघालो याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी यांनी दिली.

ज्येष्ठ नेते ऍड.शरदचंद्र शाह, बाळूशेठ विसपुते, मिलिंद भार्गव, विजय राणे, महेश राणे, विशाल मोहने, राजेंद्र शिरसाठ, बजरंग भिल यांच्यासह क्वालिटी ग्रुपचे सर्व सदस्य, समर्थक, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे तांबोळी यांनी विशेष आभार मानले आहेत. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चितच याचा दूरगामी परिणाम दिसून येईल, अशी प्रतिक्रिया क्वालिटी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद भार्गव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com