Nandurbar News : तळोद्यात ‘अंनिस’कडून प्रबोधन; जादूटोणा केलेले नारळ संघटनेचे कार्यकर्ते, नागरिकनी खाल्ले

Activists of Annis here at Kaka Sheth Gali during awakening and eating coconuts as prasad.
Activists of Annis here at Kaka Sheth Gali during awakening and eating coconuts as prasad.esakal

Nandurbar News : शहरातील काका शेठ गल्लीत एका घरासमोर करणी करून ठेवलेले नारळ अंनिस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन लोकांसमोर फोडून खाल्ले आणि लोकांच्या मनातील अंधश्रद्धा व भीती दूर करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.(black magic coconuts were eaten by Annis activists of organization citizens nandurbar news)

मंगळवारी (ता. १४) सकाळी शहरातील काका शेठ गल्लीमध्ये एका घरासमोर एक लाल दोरा गुंडाळलेले नारळ व दिवा ठेवलेला स्थानिक रहिवाशांना आढळून आला. दरम्यान सोमवारी अमावस्या व मंगळवारी दिवाळी पाडवा असल्याने करणी, जादूटोणा करून नारळ व दिवा ठेवला असल्याचा संशय नागरीकांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात मोठी भीती पसरली. याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी तळोदा शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, माजी जिल्हा प्रधान सचिव सिद्धार्थ महिरे, जिल्हा कार्यवाह मुकेश कापुरे, तळोदा शाखा सचिव अमोल पाटोळे, सहसचिव सुनील पिंपळे, सामाजिक कार्यकर्ते मित्तलकुमार टवाळे, संदीप मुके, सिद्धेश्वर गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची पाहणी केली. दरम्यान गल्लीमध्ये अधून-मधून सातत्याने असे प्रकार होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

Activists of Annis here at Kaka Sheth Gali during awakening and eating coconuts as prasad.
Nandurbar News: सातपुड्यात आढळला दुर्मिळ विषारी बांबू पीट वायपर! अस्तंबा ऋषी यात्रेकरूंना सापाचे दर्शन

रहिवाशांच्या मनात निर्माण झालेली अंधश्रद्धा व भीती दूर करण्यासाठी अंनिसच्या शिष्टमंडळने करणी करून ठेवलेले नारळ त्याचठिकाणी फोडून प्रसाद म्हणून खाल्ला. मुकेश कापुरे यांनी अशाप्रकारे करणी, जादूटोणा करून काहीही अनुचित प्रकार किंवा कोणाचेही नुकसान करता येत नाही याबाबत प्रबोधन केले.

दरम्यान अशा घटना घडवून कोणी जर समाजात भीती, अंधश्रद्धा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत प्रतिबंध घालता येतो अशा प्रकारचे प्रबोधन महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी केले. दरम्यान अनेक नागरिक व त्याठिकाणी उपस्थित लहान मुलांनी देखील जादूटोणा करून ठेवलेले नारळ अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत प्रसाद म्हणून खाल्ले.

Activists of Annis here at Kaka Sheth Gali during awakening and eating coconuts as prasad.
Nandurbar News : सर्वांच्या विचार अन् स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com