दोषी असेल तर मला जेलमध्ये टाका - खडसे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

बोदवड - ‘मी दाऊदच्या बायकोशी बोललो असेल, पैसा खाल्ला आणि भूखंड लाटला असेल, तर मला जेलमध्ये टाका आणि हिंमत असेल तर झोटिंग समितीचा अहवालही जनतेसमोर मांडा’, असे खुले आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला दिले. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत हे अभ्यासू सरकार आहे, अशी कोपरखळीही त्यांनी सरकारला लगावली. 

बोदवड तालुक्‍यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ४५ कोटी ५२ लाख रुपये खर्चाच्या योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी खडसे यांनी आपल्या मनातील खदखद जनतेसमोर मांडली. खडसे पुढे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सरकारमध्ये वाव नाही. गेल्या अनेक वर्षांत मी अनेक वटवृक्ष लावले, वाढवले. आज त्याच वटवृक्षाखाली मला जागा नाही, याची खंत वाटते. 

दरम्यान, बोदवडला आज मुख्यमंत्री पेयजल योजनेचे उद्‌घाटन झाले. त्यासाठी व्यासपीठ आणि शहरात शुभेच्छा फलक लावले होते. एकाही फलकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र वा नामोल्लेख आढळून आला नाही. भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची ही नांदी तर नाही ना, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

Web Title: bodwad news eknath khadse talking