चाळीसगाव : सतरा तासानंतर मिळाला मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

गिरणा नदीच्या पुरात वाहून आलेला मृतदेह तब्बल सतरा तासाने दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील गिरणा पात्रात आज सकाळी सात वाजता पोलिसांच्या हाती लागला असून, साधारण 50 वर्षे वयाचा प्रौढ व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान मेहुणबारे पोलिसांनी केले आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणा नदीच्या पुरात वाहून आलेला मृतदेह तब्बल सतरा तासाने दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील गिरणा पात्रात आज सकाळी सात वाजता पोलिसांच्या हाती लागला असून, साधारण 50 वर्षे वयाचा प्रौढ व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान मेहुणबारे पोलिसांनी केले आहे.

सायगाव (ता. चाळीसगाव) येथील गिरणा नदीपात्रात चार मृतदेह वाहून जाताना पाहीले असल्याची अफवा काल दुपारी तीनच्या सुमारास पसरली या अफवेने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सायगाव येथे मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हावलदार छुबुलाल नागरे यांच्यासह कर्मचारी यांनी चौकशी केली असता, येथून एक मृतदेह वरखेडे गावातील गिरणा पात्रात वाहताना ग्रामस्थांनी पाहीला परंतु पाणी जास्त असल्याने कुणीही हा मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला नाही.

रात्री उशिरापर्यंत मेहुणबारे पोलिसांनी हा मृतदेह शोधला हाती आला नाही. आज (ता. २७) साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिंन बेंद्रे यांच्यासह पोलिस हवालदार छबुलाल नागरे, गोरक चकोर यांनी सकाळी सात वाजता दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील गिरणा नदीतील पुराच्या पाण्यात ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. त्याच्या एका हातावर राजेंद्र दोस्ती व सुरेश का सुरेखा असे गोंधन आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान मेहुणबारे पोलिसांनी केले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body was found after seventeen hours