खेळण्यातील नोटा देणाऱ्यांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मालेगाव - शेतजमीन दाव्याच्या वादात येथे झालेल्या लोकन्यायालयात तडजोडीपोटी द्यावयाची 15 लाख रुपयांच्या रकमेऐवजी खेळण्यातील बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या संजय बद्रीनाथ परदेशी व राजेंद्र परदेशी या बंधूंना छावणी पोलिसांनी अटक केली. येथील न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शेतजमीन दाव्यात लोकन्यायालयात तडजोड झाल्यानंतर 15 लाख रुपये देण्याऐवजी दोघांनी चक्क खेळण्यातील नोटा देऊन गंडविले. संबंधितांच्या वकिलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली.
Web Title: Bogus Currency Crime