विद्यार्थ्यांनी घेतला प्रक्रिया आणि फुलशेतीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव

अच्युत पाटील
मंगळवार, 27 मार्च 2018

बोर्डी - एस.पी.मंडळी (माटुंगा) संचलित रामनारायण रुईया पदवीधर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण प्रकल्प अंतर्गत, बोर्डी येथील  लतिका पाटील यांच्या गोल्ड ऑर्चड चिकू प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. तसेच निरज प्रदीप पाटील यांच्या हरितगृह मधील ऑर्कीड फुलशेतीला देखील या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

पाच दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात शुभदा सावे, सचिन राणे, विनिता कोपे, गजला मुल्ला आणि प्रियंक मेहता या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते. पाच दिवसात, हरितगृह व्यवस्थापन, शेतमाल साठवणी, प्रक्रिया, पॅकिंग विषयाचा त्यांनी अभ्यास केला. तसेच प्रक्रिया आणि फुलशेतीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळवला.

Web Title: bordi ruia college students flower farmimg