Nandurbar News : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

drowned in river
drowned in riveresakal

Nandurbar News : मित्रांसोबत गोमाई नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) दुपारी घडली. ( boy death by drowning nandurbar news )

पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र पदविकेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला प्रतीकेश विश्वनाथ पाटील (रा. चिखली, ह.मु. विद्याविहार, ता. शहादा) मित्रांसोबत दरा फाट्याजवळील गोमाई नदीतील पांडवलेणी भागात पोहण्यासाठी गेला होता.

drowned in river
Dhule Crime News : भाडेकरूने मागितली खंडणी; घरमालकाची आत्महत्या

पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यास शासकीय रुग्णालय शहादा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रतीकेश एकुलता मुलगा होता. कुटुंबीयांकडून तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच शोककळा पसरली.

drowned in river
Dhule Crime News : धुळ्यात तरुणाची निर्घृण हत्या; 11 जणांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com