Dhule Crime News : धुळ्यात तरुणाची निर्घृण हत्या; 11 जणांवर गुन्हा

crime
crime esakal

Dhule Crime News : शहरातील नवनाथनगर येथील तरुणाची धारदार कोयते, लोखंडी रॉड, फाइटने बेदम मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शुभम जगन साळुंके (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी आझादनगर पोलिसांत ११ ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.( young man Kill in dhule crime news )

याबाबत मृताचा मोठा भाऊ विनायक जगन साळुंखे (२९, रा. नवनाथनगर, ५० खोलीजवळ, अभय कॉलेज रोड, धुळे) याने पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार ८ ऑक्टोबरला रात्री पावणेअकरा ते बारा वाजून पाच मिनिटांदरम्यान शहरातील गांधी पुतळ्याजवळ महेश पवार ऊर्फ लाल डोळा, गणेश माळी, जगदीश चौधरी (रा. स्वामिनारायण कॉलनी, धुळे), अक्षय साळवे, जिभ्या (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गायकवाड चौक), भूषण वाडेकर (रा. शांतीनगर), शरद (पूर्ण नाव माहीत नाही, रा. नाशिक), महेश पवारचा मित्र गणेश पाटील व इतर दोन ते तीन जण दुचाकीने हातात धारदार कोयते, लोखंडी रॉड, फाइट घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी शुभमच्या घरावर महेश पवार याने दगडफेक का केली, याचा जाब विचारला.

crime
Dhule Crime News: तलाठ्यासह 8 संशयितांवर गुन्हा; विनाचौकशी शेतजमीन नावावर

या कारणावरून कट करून त्यास प्रथम हाताबुक्क्यानी मारहाण केली. तसेच शुभमचा मित्र शिवम गोरे यासदेखील शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर शुभमला बळजबरीने दुचाकीवर बसवून कोयत्याचा धाक दाखवून वरखेडी रोडवरील महापालिकेच्या डंपिंग ग्राउंड येथे नेले.

तेथे त्यास धारदार कोयते, फाइट व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच दोन्ही पायांवर काठी व दगडाने मारहाण व ठेचून हाड मोडून गंभीर जखमी करत ठार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (ता. ९) शुभमचा मृत्यू झाला.

दरम्यान, विनोद थोरात (रा. मनमाड जीन) व त्याचा सहकारी हर्शल चौधरी यांनी भाऊ शुभम याच्याशी असलेल्या वैमनस्यातून वरील संशयित आरोपींच्या माध्यमातून शुभम याची हत्या घडवून आणल्याचा संशयदेखील विनायक साळुंखे यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.

crime
Dhule Crime News : खोटे जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी अक्कडसेच्या उपसरपंचांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com