प्रेयसीची आत्महत्या; बोहल्यावर चढण्यापूर्वीच प्रियकर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

वणी (नाशिक) :प्रियकराने फसविल्याने बंधारपाडा, ता. दिंडोरी येथील युवतीने केलेल्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या युवकास बोहल्यावर चढण्यापूर्वीच तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

बंधारपाडा (ता. दिंडोरी) येथे संगीता वाघेरे (वय २३) हिने  23 एप्रिल रोजी शेतातील झापात गळफास घेवून आत्महत्या केली होती. याबाबत संगीताच्या वडिलांना संगिताच्या कागदपत्रांमध्ये चिठ्ठी व गावातीलच पोपट भोये या युवकासोबतचा फोटो आढळून आला होता.

त्यावरून त्यांनी पोपट भोये यांने आपल्या मुलीशी प्रेमसंबध ठेवून, लग्न करण्याचे आमिष दाखवून दुसरीकडेच लग्न ठरविल्यामुळे आत्महत्या केल्याची फिर्याद वणी पोलिसांत दिली होती.

यावरुन पोलिसांत पोपट भोये या युवकावर आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी रात्री पोपट यास अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोपट काल बिलवाडी (ता. कळवण) येथे  विवाहबंधनात अडकणार होता; मात्र तत्पूर्वीच पोपट यास मध्यवर्ती कारागृहात अडकावे लागले आहे.

Web Title: Boyfriend arrested for alleged involvement in girls suicide