सोशल साईटवरिल 'बग्ज' शोधणारा अवलिया

social_media
social_media

येवला- हुशारीवर कोणाची मालकी नसते मात्र ज्यांच्याकडे आहे त्यांनाही तिचा उपयोग कल्पकतेने करता येतोच असे नाही. येथील एक अवलिया युवक असा आहे की ज्याने या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग स्वतःसाठी व समाजासाठी देखील केला आहे. होय,संगणक अभियंता असलेल्या योगेश तंटक या युवकाने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचा वापर करून फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, तेज, पेपल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट या मीडियातील प्रोग्राममधील त्रुटी शोधून संबंधित कंपन्यांना त्याची दुरुस्ती करायला भाग पाडले आहे. विशेष म्हणजे या बदल्यात त्याच्यावर तब्बल २८ हजार डॉलरच्या (१८ लाख) बक्षीसांची खैरातही झाली आहे.

बाभूळगाव (येवला) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन संगणक अभियंता झालेला योगेश सध्या पुण्यात ‘इन्फोगेन’ कंपनीत कार्यरत आहे. आपल्या हुशारीला विश्वव्यापी बनवत त्याने समाजात लोकप्रिय असलेल्या विविध ऍप्लिकेशन मधील चुका दोन वर्षात तब्बल बारा वेळेस शोधल्या आहेत. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या देखील त्याने त्रुटी शोधून काढल्या. 

एखादी छोटीशी चूक कसा करोडोंचा नुकसान करते याचा अनुभव फेसबुक सध्या घेत आहे. त्यामुळे योगेशने तांत्रिक चुका निदर्शनास आणून दिल्या. त्याची फेसबुकने वेळीच दुरुस्ती करत योगेशचा बक्षिसे देत गौरव केला आहे. दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम योगेशने फेसबुकवर रिकमांड करताना अकाऊंट हॅकिंगची त्रुटी 
शोधली व फेसबुकने ही दुरुस्ती केली होती.

त्यानंतर फेसबुकच्या अकाऊंट हॅकिंगचा सर्वात मोठा 'बग' दोन २०१६मध्ये त्याने शोधला होता. फेसबुकमध्ये इव्हेंट क्रिएट केल्यानंतर ती पोस्ट सुरक्षित राहत नव्हती. शिवाय अश्या फेसबुक खात्याची इतर माहिती कोणाही वापरकर्त्याला मिळू शकत होती. याद्वारे कोणाचेही खाते वापरले जाणे सोपे बनत होते. विशेष म्हणजे मूळ अकाउंटला याचा पत्ता देखील लागत नव्हता. ही त्रुटी त्याने फेसबुक टीमच्या निदर्शनात आणून दिल्यावर फेसबुकने योगेशचे अभिनंदन करत १० लाखाचे सर्वात मोठे बक्षीस दिले होते. आत्तापर्यंत त्याने सलग फेसबुकच्या सहा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या असून, या प्रत्येक वेळी त्यांचा डॉलरमध्ये बक्षीस देऊन गौरव झाला आहे.

आता सोडली ही त्रुटी!
फेसबुक मध्ये ऍनालीटीकस मॅनेजर म्हणून फंकशनॅलिटी आहे. ज्याद्वारे फेसबुकच्या सर्विसेस वापरणाऱ्या कंपनी आपल्या बिझनेसची सर्व माहिती डाउनलोड करू शकतात. या कंपन्यांची माहिती, महसूल, गुंतवणूक आदी गोष्टी सहजपणे मिळवता येत असल्याचे योगेशने मागील आठवड्यात निदर्शनास आणून दिल्याने चर्चेत असलेल्या फेसबुकने त्वरित ही दुरुस्ती केली. 

गुगल, पेपल, अॅपलला केली मदत!
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची देवाणघेवाण करणाऱ्या लोकप्रिय पेपलमध्येही लिंकवरून अकाऊंटचा वापर करणे कसे सुलभ होते. ही त्रुटी योगेशने शोधली होती. याशिवाय इन्स्टाग्राममध्ये विक पासवर्ड असताना अकाऊंट वापरता येणे कसे सुलभ आहे. हे देखील त्याने शोधले होते. याशिवाय गुगलचे अॅप, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांच्या अभियंत्यांकडून राहिलेल्या त्रुटी देखील योगेशने निदर्शनास आणून दिल्या व संबंधिक कंपन्यांना सुधारणा करण्यास भाग पाडले आहे.

शून्यातून उभे केले स्वतःचे विश्व!
उंच भरारीचे स्वप्न पाहण्याच्या वयातच नियतीने योगाचे वडिलांचे क्षेत्र हिरावून घेतले. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न उभा असतांना येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेऊन आपल्या स्वप्नांना मूर्त रुप दिले आहे. संस्थेकडून फी साठी मिळालेली सवलत तसेच आजोबा, काका व नातेवाईकांचे प्रत्येक अडचणीत मिळालेले सहकार्य या जोरावर योगेशने अभियंता होण्याचे शिक्षण पूर्ण केले. तुमच्याकडे लढण्याची उमेद व महत्वाकांक्षा असली की शून्यातून उभे राहत कुणालाही हेवा वाटावा अशी उंचच उंच भरारी घेणे सहज शक्य असल्याचे योगेशने दाखवले आहे. 

असे मिळाले योगेशला बक्षीसे..
फेसबुक - १ हजार डॉलर
फेसबुक - १५ हजार डॉलर
इन्स्टाग्राम - ५ हजार डॉलर
फेसबुक - १ हजार ५०० डॉलर
फेसबुक - १ हजार ५०० डॉलर
फेसबुक - १ हजार डॉलर
गुगल - १०० डॉलर
गुगल - १०० डॉलर
तेज अॅप - हॉल ऑफ फेम
पेपल - ३ हजार डॉलर
अॅपल - हॉल ऑफ फेम
मायक्रोसॉफ्ट - हॉल ऑफ फेम
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com