Nandurbar News : भरडधान्य खरेदीसाठी नोंदणीची 1 मे पर्यंत मुदत | bulk purchase Registration deadline tomorrow List of purchasing centre center head announced Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grain news

Nandurbar News : भरडधान्य खरेदीसाठी नोंदणीची 1 मे पर्यंत मुदत

Nandurbar News : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगांव येथे आधारभुत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी (कास्तकार) बुधवार (ता. ३१)पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक न. ना. रणमाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय आधारभुत खरेदी योजनेंतर्गत मकासाठी १ हजार ९६२, तर ज्वारीसाठी २ हजार ९७० दर निश्‍चित केला आहे. (bulk purchase Registration deadline tomorrow List of purchasing centre center head announced Dhule News)

खरेदी केंद्र व खरेदी केंद्र प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक असे : नंदुरबार तालुक्यात धानोरा व लोणखेडा- व्ही. बी. पाडवी (९६८९६५०८९३ ), टोकरतळे- एन. बी. वळवी (९७३०८०४६७२), वावद- एस. ए. पावरा (९४०४५७७२९३), नवापूर तालुक्यात नवापूर कोठडा, विसरवाडी, खांडबारा- एम. आर. गिरासे (९४०३९४०९७६), शहादा तालुक्यात मंदाणा- एन. बी. जमादार (९६७३३०२२७९), तळोदा तालुका प्रतापपूर (संस्थेचे)- एन. बी. पावरा (८८०५५९२४३९), शिर्वे- एम. डी. सोनवणे (९४०३६०८६९४), अक्कलकुवा तालुका खापर- एन. बी. पावरा (९४२००५७३५४), मोलगी- जी. डी. पावरा (८२६१८६५७९३), तसेच धडगाव तालुका- जी. डी. पावरा (८२६१८६५७९३).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संबंधीत भागातील शेतकरी, कास्तकारांनी आपले भरडधान्य ज्वारी व मका खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी २०२२-२०२३ मधील रब्बी पिकपेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची छायाप्रतीसह नोंदणीसाठी स्वत: उपस्थित राहावे, असे श्री. रणमाळे यांनी कळविले आहे.