Nandurbar Crime News : महाराष्ट्रातील मोठ्या शहरात घरफोड्या करणारा LCBच्या जाळ्यात

Thief Arrested
Thief Arrested esakal
Updated on

नंदुरबार : शहरातील गांधीनगरजवळील मेडीकलमध्ये शटर उचकटून १५ हजाराची चोरी झाली होती. त्याचा तपास सुरू असतानाच पेरजापूर (जि.जालना) येथील दगडूबा एलसीबीच्या हाती आज लागला. मूकबधिर असूनही आतापर्यंत त्याने औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, नाशिक येथे ३१ घरफोड्या केल्या आहेत. त्याचाकडून प्राथमिक तपासातच सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

नंदुरबार शहरातील गांधीनगर परिसरात रिक्षा स्टॉपजवळ असलेले न्यू आरती मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून १५ हजाराची चोरी झाली होती.

नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरू असताना मंगळवारी (ता. २९) पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की न्यू आरती मेडीकल शॉप येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित नंदुरबार रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे, त्यावरून अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितले. त्यांनी एक पथक पाठवून खात्री करत संशयितास ताब्यात घेतले. (Burglar in big city of Maharashtra in LCB is Arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Thief Arrested
Nashik Crime News : रुई येथील युवतीचा विनयभंग; कुटुंबाला मारहाण

दगडूबा मूकबधिर असला तरी सराईत गुन्हेगार

दगडूबाची विचारपूस केली असता तो मूकबधिर असल्याचे निदर्शनास आले. निरीक्षक खेडकर यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय-३२ रा. पेरजापूर ता. भोकरदन जि. जालना) असे एका कोऱ्या कागदावर लिहून सांगितले. त्याची

झडती घेतली असता त्याच्या खिशात सात हजार ५४० रुपये रोख मिळून आले. त्यास पैशांबाबत विचारले असता त्याने मेडीकल दुकानात

रात्रीच्यावेळी चोरी केल्याचे हातवारे करून व कागदावर लिहून सांगितले, ते पैसे जप्त केले.

शिक्षकाची मदत

मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांचा मदतीने इतर चोरी बाबत विचारले. त्याने खांडबारा, अक्कलकुवा, रनाळे, भुसावळ (जि.जळगाव), साक्री (जि. धुळे) या ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्याचाकडून सहा गुन्हे उघडकीस आले.

३१ घरफोड्या

संशयित आरोपी दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय-३२ रा. पेरजापूर ता. भोकरदन जि. जालना) याच्याविरूद्ध महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, नाशिक येथे घरफोडी व चोरीचे ३१ गुन्हे दाखल आहेत. त्याचाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. असे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधिक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक खेडकर, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार महेंद्र नगराळे, पोलिस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, पोलिस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thief Arrested
Nashik News : रंगीबेरंगी खड्यांपासून महात्मा फुलेंचे साकारले चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com