Dhule Crime News : धुळ्यात 3 ठिकाणी घरफेोडी; रोकड, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास | Burglary at 3 places in Dhule Lakhs instead of cash and jewels Dhule Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule Crime News : धुळ्यात 3 ठिकाणी घरफेोडी; रोकड, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास

Dhule News : शहराच्या देवपूर भागातील गजानन सोसायटी येथे एका शिक्षकाच्या घरासह तीन घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. दरम्यान, चौथ्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

देवपूर जीटीपी चौकाजवळील गजानन हाउसिंग सोसायटीतील रहिवासी संजय यशवंत पाटील (प्लॉट क्रमांक-२८) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. श्री. पाटील हे डांगर बुद्रुक (ता. अमळनेर) येथे शिक्षक आहेत. ३ जूनला ते कुटुंबासह हॉलमध्ये झोपले होते. (Burglary at 3 places in Dhule Lakhs instead of cash and jewels Dhule Crime News)

पहाटे तीनपूर्वी चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. साडेतीनच्या सुमारास श्री. पाटील यांच्या सासूबाईंना जाग आली. त्यांना हॉल जवळच्या एका रुममध्ये लाइट सुरू असल्याचे दिसले.

त्या तेथे गेले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व स्टोअर रूमच्या खिडकीचे ग्रील तुटलेले निदर्शनास आले. त्यांनी जावई श्री. पाटील यांच्यासह कुटुंबीयांना उठविले.

श्री. पाटील यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. देवपूर पोलिस ठाण्याचे मिलिंद सोनवणे, बंटी साळवे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चोरट्यांनी घरातून ९० हजार रुपये रोख, चांदीची लक्ष्मीची मूर्ती चोरून नेली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. पाटील यांच्या घरी चोरी झाल्याचे समजल्यावर परिसरातील नागरिकही जमले. चोरट्यांनी जवळच एसएसव्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. पुरुषोत्तम शिवदास देसले (प्लॉट क्रमांक-२६) यांच्या घराच्या मागील बाजूस खिडकीचे ग्रील तोडून त्यांच्या घरातूनही चार ते पाच हजार रुपये रोकड लंपास केल्याचे समजले.

प्रा. देसले यांच्या घरासमोर प्रमोद रवींद्र भामरे (प्लॉट क्रमांक-१९) यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे ग्रील काढून तेथेही चोरट्यांनी चांदीची मूर्ती, सोन्याचे दागिने व घराबाहेर लावलेली स्कुटी लंपास केली.

तसेच जवळच असलेल्या प्लॉट क्रमांक-२२ मधील दुसऱ्या मजल्यावरील भाडेकरुचेही घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने अयोध्यानगर येथील राम मंदिरापर्यंत माग काढला. या घटनेने मात्र, परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.