वणीजवळ सुरत आगाराची बस झाली पलटी; 7 प्रवासी जखमी

वणीजवळ सुरत आगाराची बस झाली पलटी; 7 प्रवासी जखमी

वणी (नाशिक) : वणी-सापूतारा रस्त्यावर वणी शिवारात धनाई माता मंदिराजवळ गुजरात परिवहन महामंडळाची बस पलटी होऊन तीन महिलांसह सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

सापूतारा - पिंपळगांव बसवंत या राष्ट्रीय महामार्गादरम्यान हतगड ते वणी या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी एक पट्टा कामासाठी ते एक पट्टा वाहतूकीसाठी तयार करण्यात आला आहे. याच रस्त्यावर वणी शिवारातील धनाई माता मंदिराजवळ सुरत आगाराची शिर्डी - सुरत- अमरेली ही बस शिर्डीहून अमरेलीेे येथे जात असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला रस्ता (साईड) देताना रस्त्याच्या डाव्या बाजूस करण्यात आलेल्या मातीच्या साईड पट्टीवर बसचे चाक रुतून बस पलटी झाली. यात बसचालक महेंद्रसिंग धनपतसिंग चव्हाण, (वय ३९ रा. सुरत, राजेशभाई) विठ्ठलभाई कुशारे, (वय ४५ रा. सुरत), ललीता रमेशकुमार प्रजापती, (वय २५ रा. जोधपूर), अमेधाराम निंबाराम प्रजापती, (वय ४५ रा. बाडनेर), अरुणभाई मोतीभाई तडवी (वय ५३ रा. बडोदा), मीनाक्षी अरुणभाई तडवी (वय ४८ रा. बदोडा), कमळाबाई कुवरलाल प्रजापती (वय ५२ रा. जोधपूर) हे गंभीर जखमी झाले. तर इतर २२ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. 

दरम्यान, जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सात रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत असून, अन्य प्रवासी पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहेत. याबाबत वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात येत असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com