महामार्गावर बस-ट्रकची समोरासमोर धडक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

जळगाव - महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू असताना आज सकाळी साडेसातला भुसावळकडून येणाऱ्या महामंडळाच्या बसला धुळ्याकडून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. धडक एवढ्या जोरात होती की बस चालकाकडील बाजू चक्‍काचूर झाली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, बस चालक व वाहक हे जखमी झाले.

दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. 
यावल आगाराची खिरोदा- जळगाव बस (क्र. एमएच २० बीएल ०९३२) भुसावळकडून जळगावला येत असताना सकाळी साडेसातला आकाशवाणी चौकात महामार्गावरून धुळ्याकडून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १९ जेड ५३५४ ) लाडवंजारी हॉल जवळ बसला समोरून जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात चालकाच्या बाजूने बसचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालक भागवत लोहार (वय ३७) याच्या पायाला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

तर वाहक तेजसिंग भानसिंग राजपूत (वय ५५) रा. यावल यांना डोक्‍याला इजा झाल्याने त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमी ट्रॅक चालक आदिन खान नवाज (वय २८) रा. समतानगर याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ट्रॅक चालकाविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

सुदैवाने जीवित हानी टळली
खिरोदावरुन येणाऱ्या बसमध्ये सकाळी प्रवाशांची संख्या कमी होती. जळगावात कालिकामाता, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौफुलीवर अनेक प्रवासी उतरले. बसमध्ये केवळ दोन तीन प्रवासीच मागच्या आसनावर बसलेले होते. घडलेला अपघाताची भीषणता पाहता बस चालकापासून तीन ते चार नंबरच्या आसनापर्यंत चक्काचूर झाली. प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Web Title: bus-truck accident in jalgav