खानदेशचा सन्मान : बटरफ्लायला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट लघू चित्रपट अवॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Short Film Award

खानदेशचा सन्मान : बटरफ्लायला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट लघू चित्रपट अवॉर्ड

नंदुरबार : येथील बाल रोगतज्ज्ञ डॉ सुजित पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बटरफ्लाय’ या लघू हिंदी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म महोत्सवात उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड पश्चिम बंगालच्या फेस्टीवलमध्ये जाहीर झाला आहे. विन्टेज रील्स फिल्म फेस्टीवलमध्येही तीन अवॉर्ड ‘बटरफ्लाय’ला घोषित झाल्याची माहिती निर्माते डॉ. राजकुमार पाटील यांनी दिली.

शहरातील डॉक्टर व कलाकारांचा सहभाग असलेला बटरफ्लाय हा लघुचित्रपट नंदुरबार शहरात २९ मेस दाखविण्यात आला होता. त्यावेळेस या चित्रपटाला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात बेस्ट शॉर्ट फिल्म चा ॲवॉर्ड मिळवून आम्हाला सु:खद धक्का दिला आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका वठवली असल्याचे मत डॉ. राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

या लघूचित्रपटाला बेस्ट युथ डायरेक्टर, बेस्ट डायलॉग, फेस्टिवल मेन्शन अॅवार्ड असे तीन वेगळे अॅवार्ड वीन्टेज रील्स फिल्म् फेस्टीवलमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.

हेही वाचा: ॲनिमेशनच्या जगातला वेगळा प्रयोग - गुलाबो सपेरा

रणजितसिंग राजपूत, डॉ राजकुमार पाटील, डॉ वृषाली पाटील, पूनम भावसार, डॉ. राजेश कोळी, डॉ. प्रकाश ठाकरे, दिलीप सोनार, दिलीप सोनार, प्रशंसा तवर, कामिनी भोपे, डॉ. जयंत शाह, संदीप सूर्यवंशी, अनिता वसावे, नंदा सोनार, रवींद्र पोतदार, डॉ. स्वप्नील जैन, नागसेन पेंढारकर, डॉ. अनिकेत नागोटे आदींची भूमिका आहे. कथा ड. सुजित पाटील यांची असून मानसिंग राजपूत, सारजन शेट्टी, मयूर सूर्यवंशी यांनी कॅमेरामन म्हणून काम केले.

अवॉर्ड मिळणे खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट : डॉ. पाटील

डॉ. सुजित पाटील यांनी आतापर्यंत पाच शॉर्ट फिल्म बनवल्या असून जवळपास सर्वच लघू चित्रपटांना अवॉर्ड मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भरवून त्यांनी नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. त्यांचे लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत आहेत. डॉ. सुजित पाटील यांनी आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. नंदुरबारच्या लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अवॉर्ड घोषित झाल्याने ही केवळ आमच्यासाठीच नव्हेतर खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. राजकुमार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: स्त्रीच्या साहसाची सर्वार्थ गाथा : बाईची भाईगिरी

Web Title: Butterfly Win International Short Film Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..