मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्याची सुनावणी इन कॅमेरा नाहीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्याची सुनावणी इन कॅमेरा घेण्याची एनआयएची मागणी विशेष न्यायालयाने अमान्य केली आहे.

मुंबई ः मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्याची सुनावणी इन कॅमेरा घेण्याची एनआयएची मागणी विशेष न्यायालयाने अमान्य केली आहे.

पत्रकारांनी एनआयएच्या निर्णयाला अर्जाद्वारे विरोध केला होता. त्यामुळे आता खटल्याची सुनावणी खुल्या न्यायालयात होईल. मात्र संवेदनशील खटला असल्याने वार्तांकनाबाबतीत न्यायालयाने निबर्ध लावले आहेत. खासदार आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह  प्रसाद पुरोहित या खटल्यात आरोपी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In-camera hearing of Malegaon bombing case denied special court