उमेदवारांनी केलेत पक्षविरहीत पॅनेल

संपत देवगिरे 
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पक्षाची उमेदवारी राहिली कागदावर 

नाशिक - बहुसदस्यीय प्रभागांमुळे राजकीय पक्षांना महत्व आल्याचे चित्र असले तरीही अनेक प्रभागांत उमेदवारांनी राजकीय पक्ष सोयीनुसार बाजुला ठेवत सोयीचे पॅनेल केली आहेत. त्यामुळे या स्वयंघोषीत नेत्यांमुळे राजकीय पक्ष दावणीला बांधले गेले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ होतोच आहे, शिवाय मतदारही गोंधळात पडण्याची शक्‍यता आहे. 

पक्षाची उमेदवारी राहिली कागदावर 

नाशिक - बहुसदस्यीय प्रभागांमुळे राजकीय पक्षांना महत्व आल्याचे चित्र असले तरीही अनेक प्रभागांत उमेदवारांनी राजकीय पक्ष सोयीनुसार बाजुला ठेवत सोयीचे पॅनेल केली आहेत. त्यामुळे या स्वयंघोषीत नेत्यांमुळे राजकीय पक्ष दावणीला बांधले गेले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ होतोच आहे, शिवाय मतदारही गोंधळात पडण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या प्रभाग तेरा मध्ये कॉंग्रेसचे गटनेते शाहू खैरे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा वत्सला खैरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार आणि मनसेच्या सुरेखा भोसले असे पॅनेल केले आहे. सर्व संकेत बाजुला ठेऊन त्यांनी समर्थकांसह जाऊन अर्जही एकत्रच दाखल केले. अशीच स्थिती प्रभाग सोळा मध्ये असून येथे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे यांनी सुरुवातीपासून अनुसुचित जाती महिलांसाठीच्या साठी राखीव गटात ज्योती जोंधळे व महिला राखीव गटामध्ये प्रभा तडवी यांच्या समवेत प्रचार केला. पण अखेर तडवी यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून निवडणुक लढवत आहेत. वंदना मनचंदा या इथल्या कॉंग्रेस उमेदवार आहेत. वाटली आहेत. 

राजकीय पक्षांनी यावेळी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केला तसेच एबी फॉर्म देण्यात त्याहूनही मोठा गोंधळ केला. त्याबाबत विविध स्तरावर आरोप केले जात आहेत. शिवसेनेने तर महत्वाच्या उमेदवारांनाच एबी फॉर्म देण्याबाबत दुपारी तीन पर्यंत गोंधळ घातला. त्यात सात अधिकृत उमेदवारांना वेळेत फॉर्म सादर करता आलेले नसल्याने या ठिकाणी शिवसेनेचे चिन्हच नाही. स्वबळावर सत्ता संपादनाच्या गर्जना करणाऱ्या राजकीय नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत येईल त्याला उमेदवारीचे आश्‍वासन देत प्रवेश सोहळे केले. त्यानंतर मात्र हे तारु भरकटण्याची जाणीव झाल्यावर उमेदवारीचा गोंधळ घातला. त्याचा परिणाम विविध स्तरावर झाला आहे. त्यामुळे बहुसदस्यीय प्रभागांचे चित्र अधिक गोंधळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे. 

Web Title: Candidates have formed separate panels