महिलेला मारहाण प्रकरणी माजी आमदारपुत्रासह 14 जणांवर गुन्हे

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

नागापूर येथे बेबीबाई पवार व सूरज पवार यांच्यात जुने वाद होते. त्यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. यात महिला जखमी झाली आहे

मनमाड - येथून जवळ असलेल्या नागापूर येथे अंतर्गत वादातून झालेल्या मारहाणीत महिलेला मारहाण करून विनयभंग, दंगल केल्याप्रकरणी माजी आमदारपुत्र सूरज पवार याच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली असून, अजून तीन जण फरारी आहेत.

काल (ता. 9) रात्रीच्या सुमारास नागापूर येथे बेबीबाई पवार व सूरज पवार यांच्यात जुने वाद होते. त्यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. यात महिला जखमी झाली आहे. बेबीबाई पवार यांनी मनमाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की दिनेश सोमासे, प्रमोद सोमासे, सागर पवार, भाऊसाहेब पवार, सूरज पवार, ज्ञानेश्‍वर काळे, नीलेश दखणे, गणेश पवार, सोमनाथ सोमासे, विजय सोमासे, अशोक सोमासे, नीलेश पवार, दादा पवार यांच्यासह एकाने घरात घुसून मारहाण केली. यावरून दंगल करणे, मारहाण करणे, सदर महिलेचा विनयभंग करणे आदींसह विविध गुन्हे 14 जणांवर दाखल करण्यात आले आहेत. यातील 11 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली; तर तीन जण फरारी आहेत.

Web Title: case against former MLA's son