जातपडताळणी समितीच्या  अध्यक्षांकडून चौकशी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

जातपडताळणी समितीच्या 
अध्यक्षांकडून चौकशी 

जातपडताळणी समितीच्या 
अध्यक्षांकडून चौकशी 

जळगाव : येथील सामाजिक न्याय भवनातील जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा चित्रा सूर्यवंशी यांनी आज दाखल्यांसाठी आर्थिक मागणी होत आहे का, याबाबत जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांकडून जाणून घेतले. तसेच थेट पालक व विद्यार्थ्यांना कार्यालयातूनच दाखले घ्यावे कोणालाही दलाली देऊ नये, असे आवाहन केले. "सकाळ'ने आज "बारा हजारांत मिळवा जातवैधता प्रमाणपत्र' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती, त्याची दखल घेत आज चौकशी केली. 
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला गेल्या आठवड्यापासून सुरवात झाली. उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे. मात्र, जातपडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परिणामी, या कार्यालयात दलालांनी प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्यासाठी बारा हजार रुपयांपर्यंतची मागणी विद्यार्थ्यांकडे केली जात होती. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच उपाध्यक्षा वैशाली हिंगे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. 

सुरक्षारक्षकांना दिल्या सूचना 
दलालांचा सुळसुळाट वाढल्याने अध्यक्षा सूर्यवंशी यांनी सुरक्षारक्षकांना अनोळखी व्यक्तीस प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या. तसेच कर्मचाऱ्यांनी देखील असे प्रकार घडत असल्यास थेट कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

Web Title: caukashi