मोठ्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणार : पोलिस निरीक्षक

dhule
dhule

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मेहुणबारे( ता.चाळीसगाव)  पोलिस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी परिसरातील  मोठ्या गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या स्थापना करून लोकसहभागातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.सीसीटीव्हीसाठी ग्रामस्थानी सहकार्य करावे असे आवाहन सायगाव (ता. चाळीसगाव) येथे झालेल्या बैठकीत साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ग्रामस्थांना केले.

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 55 गावे आहेत.यातील अनेक गावे मोठी आहेत. यामध्ये सायगाव,पिलखोड, टाकळी, उंबरखेडे यासरख्या गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना त्यामध्ये तरुणाचा समावेश करण्यात येणार आहे. लोकसहभागातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे हे गावाच्या मुख्य चौकात,तसेच रहदारीच्या ठीकाणी बसविण्यात येतील. यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे मत त्यांनी व्यक्त हिरे यांनी व्यक्त केले.सायगाव येथे दत्त जयंती निमित्त मोठी यात्री भरत असते. येथील यात्रा पंधरा दिवस चालते.यात्रा सुरू होण्यापुर्वी या गावात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. हिरे यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ग्रामस्थांनी देखील बैठकीत पुढाकार घेतला तसेच पन्नास हजार रूपयांचा निधी देखील प्राप्त झाला आहे.

रात्रीची दुचाकीवरून गस्त
मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त  दुचाकीवरून घालण्याचा नविनच उपक्रम वरिष्टांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात येणार आहे.मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी कमी असली, तरी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. लोकांमध्ये पोलिसाविषयी असलेली भीती दुर होवुन त्यांच्यांशी सुसंवाद साधला जावा यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची संकल्पना श्री. हिरे यानी यावेळी बोलुन दाखवली. बैठकीला सायगावचे सरपंच व उपसरपंच व  ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com