Dhule News : केंद्रीय पथक करणार रुग्णालयांची पाहणी : आमदार रावल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA jaykumar raval

Dhule News : केंद्रीय पथक करणार रुग्णालयांची पाहणी : आमदार रावल

धुळे : दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय व शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव आहे. या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याचेही आमदार श्री. रावल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Nandurbar News : प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन छेडणार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय व शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. अतिदक्षता विभागासह सोनोग्राफी, सीटी स्कॅन आदी विविध वैद्यकीय यंत्रसामग्री तसेच इतर भौतिक सुविधांचा या रुग्णालयांमध्ये अभाव आहे. तसेच अपूर्ण बेडक्षमता आहे. या सर्व सुविधांची उपलब्धता व्हावी, अशी मागणी श्री. रावल यांनी मंत्री श्रीमती पवार यांच्याकडे केली. या अपूर्ण सुविधांप्रश्‍नी केंद्रीय पथक प्रत्यक्ष या रुग्णालयांमध्ये येऊन पाहणी करून आढावा घेणार आहे.

त्यानंतर सर्व सुविधांच्या पूर्ततेबाबतचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयात जाईल व त्यानंतर या सुविधा उपलब्ध होतील. केंद्रीय पथक १९ डिसेंबरला विखरण प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर २० डिसेंबरला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात व २१ डिसेंबरला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार असल्याचेही आमदार रावल यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पथकाच्या पाहणीनंतर शिंदखेडा तालुक्यातील दोन्ही महत्त्वाच्या रुग्णालयांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीमती पवार यांच्याकडे केलेल्या मागणीला मोठे यश मिळाल्याचे आमदार रावल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Orchard Grant Announced : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना!

टॅग्स :DhuleHospital