सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा 2 ते 13 मे दरम्यान होत आहे. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे.

नाशिक - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा 2 ते 13 मे दरम्यान होत आहे. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडीत "नीट' परीक्षा 5 मे रोजी होत असल्याने 4 व 5 मे रोजी दोन्ही सत्रांतील तर 6 मे रोजी सकाळच्या सत्रात सीईटी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीईटी परीक्षा देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले होते. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटात परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होईल.

Web Title: CET Exam Time Table Declare