अच्छे दिनाचे अपचन झाले असेल तर सच्चे दिन आणा 

bhujbal
bhujbal

येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा नुसता पाऊस मात्र काम करण्याचा दुष्काळ असलेले बोलघेवडे सरकार आहे असा चिमटा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काढला. 

त्यांच्या हस्ते आज मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या दौऱ्यात जेष्ठ नेते ऍड.माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर,राधाकिसन सोनवणे, अरूण थोरात, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, मोहन शेलार, वसंत पवार, साहेबराव मढवई, किसन धनगे, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, संतोष खैरणार, साहेबराव बोराडे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की,संपुर्ण महाराष्ट्रातच विकासकामांचा वेग कमी झाल्याने काम करणारे कोण आणि बोलघेवडे कोण आता जनतेने वेळीच ओळखण्याची गरज आहे. अच्छे दिनचे अपचन झाले असेल तर सच्चे दिन कसे येतील त्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. ऍड.माणिकराव शिंदे, थोरात, महेंद्र काले, संजय बनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

भुजबळ यांच्या हस्ते धामणगांव येथील आदिवासी वस्तीत विद्युत पुरवठा महालगांव (गोल्हेवाडी), न्याहारखेडा, वाईबोथी, रावतेवस्ती सामाजिक सभामंडपाचे लोकार्पण तसेच पाटोदा येथे शादिखाना, भक्तनिवास इमारतीच, रस्ता कॉक्रिटीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

शेती पंप ग्राहकांसाठी ४० कोटीची कामे 
सन २०१० पासून पैसे भरलेल्या उच्चदाब प्रणालीअंतर्गत तालुक्यातील शेती पंप ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येत असून एकूण ४० कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण २५८७ रोहित्र यामध्ये स्वतंत्र १० केव्हीए, १६ केव्हीए, २५ केव्हीए असे रोहित्र मंजूर करण्यात आलेले आहे.यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यापासून मुक्तता होऊन अखंड योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे. ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण सुद्धा अत्यल्प होणार आहे. नवीन देण्यात येणाऱ्या रोहित्राची ५ वर्षाची गॅरंटी असून त्वरित संबंधित एजन्सी रोहित्र नादुरुस्त झाल्यास बसवून देणार आहे, असे भुजबळ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com