'ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी दोन दिवसांनंतर निकाल'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

निवडणुकांचे निकाल दोन दिवसांनंतर का? ईव्हीएममध्ये गडबड करायला का? ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी निकाल दोन दिवस लांबवले जात आहेत. येवला मतदारसंघातूनचं राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त केली असून, विधानसभेचे निकाल निवडणुकीनंतर दोन दिवसांनंतर का ठेवले आहेत? ईव्हीएममध्ये गडबड करायची आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (शनिवार) विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होत असून, 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. मतदानानंतर दोन दिवसांनी निकाल असल्याने विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

भुजबळ म्हणाले, की निवडणुकांचे निकाल दोन दिवसांनंतर का? ईव्हीएममध्ये गडबड करायला का? ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी निकाल दोन दिवस लांबवले जात आहेत. येवला मतदारसंघातूनचं राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. युतीच्या तिकीटवाटपानंतर सेना-भाजपलाही गळती लागणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chagan Bhujbal targets election commission on dates for Maharashtra Vidhan Sabha