esakal | "अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं याला माझा विरोध नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

CHAGAN BHUJBAL AND AJIT PAWAR.jpg

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. मात्र हा पवार साहेबांचा अधिकार आहे असे वक्तव्य कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले आहे. कॅबीनेट मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी नाशिक आणि येवल्यातील कार्यकर्त्यांना भेट दिली.

"अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं याला माझा विरोध नाही"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. मात्र हा पवार साहेबांचा अधिकार आहे असे वक्तव्य कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले आहे. कॅबीनेट मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी नाशिक आणि येवल्यातील कार्यकर्त्यांना भेट दिली.

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार.. येत्या २ दिवसात हा प्रश्न मिटेल

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून येत्या दोन दिवसात हा प्रश्न मिटेल असे भुजबळ म्हणाले.भुजबळ संपला असं लोकांना वाटत होतं पण पवार साहेबांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा व्यवस्थित झाले असे सांगत भुजबळांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. मुंबईत अनेक घडामोडी घडत होत्या म्हणून नाशकात येऊ शकलो नाही. मंत्री म्हणून नाशिकला येणं यावेळी वेगळेपण आहे. 

बोट क्लब पुन्हा सुरू करणार

माझ्या वाईट कालावधीत अनेकांनी प्रेमानं खंबीर साथ दिली असून ही दृश्य म्हणजे माझ्या आयुष्यातील सिनेमा असल्यासारखा वाटतो तसेच पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून अनेक अपूर्ण कामं पूर्ण करणार आहे असेही भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी गंगापूर धरणावर केलेल्या बोट क्लबला भेट दिली. वणीची फ्युनिक्युअर ट्रॉली ही देशातली पहिली ट्रॉली असून अशी अनेक कामं करण्यात आली. गंगापूर धरणावरील अनेक महिने पडलेल्या बोटी येथून गायब झाल्यामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारकडून या बोटींचा शोध घेतला जाऊ शकतो असे बोलण्यात येत होते..त्यावरच भुजबळांनी बोट क्लब पुन्हा सुरू करणार असे सांगितले. 

या सरकारला थोडा वेळ द्या, मग टीका करा . 

या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते असून या सरकारला थोडा वेळ द्या, मग टीका करा असा नारायण राणेंना भुजबळांनी टोलाही लगावला. भाजपात ओबीसी नेते नाराज असून एकनाथ खडसेंच्या आरोपात तथ्य आहे.तसेच हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही. खडसे अनुभवी,योग्य निर्णय घेतील असेही ते खडसेंबद्दल बोलले.

प्रथम मानसिकता बदलण्याची आवश्यकता

देशात बलात्काराच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, समाजात विकृत गुन्ह्यांची वाढ झाली असून प्रथम मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. तसेच देशात कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असून  जो त्वरीत कारवाई करत नाही तो पोलीस अधिकारी जबाबदार धरला जाईल असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा  > तीन वर्षांची 'ती' चिमुकली सर्वांचीच लाडकी...पलंगावर खेळत होती...अचानक..

 > ती म्हणाली " माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू"..तरीही पतीने....

 > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....