
गव्हाणे आणि नरपतसिंह गावित हे दोघे पाथर्डी गावात शेजारी-शेजारी राहत होते. पंधरा दिवसापूर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे घरमालकाने संशयित विठ्ठल गव्हाणे यास घर खाली करून काढून दिले होते. दरम्यान, शुक्रवार (ता.6) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गावित हा कंपनीत जाण्यासाठी पाथर्डी-गौळाणे रस्त्याने जात होता.
नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला तिच्या पतीने शुक्रवारी (ता.6) सकाळी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सदरची घटना पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौळाणे रस्त्यावरील घटना : असा घडला प्रकार...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरपत सिंह गावित असे मृताचे नाव असून संशयित विठ्ठल गव्हाणे पसार झाला आहे. संशयित गव्हाणे आणि नरपतसिंह गावित हे दोघे पाथर्डी गावात शेजारी-शेजारी राहत होते. पंधरा दिवसापूर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे घरमालकाने संशयित विठ्ठल गव्हाणे यास घर खाली करून काढून दिले होते. दरम्यान, शुक्रवार (ता.6) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गावित हा कंपनीत जाण्यासाठी पाथर्डी-गौळाणे रस्त्याने जात होता. त्यावेळी संशयित विठ्ठल गव्हाणे याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केल्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तश्राव झाल्याने गावितची परिस्थिती गंभीर होती.
हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...
अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून समोर
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, सागर पाटील हे घटनास्थळी पोहोचले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, साडेदहाच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. दरम्यान, संशयित गव्हाणे याच्या पत्नीशी गावितचे अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. संशयित गव्हाणे फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा > PHOTOS : अनेक शेळ्या फस्त करणारा 'तो'...पारेगावात दिसलाच शेवटी..नागरिकांमध्ये घबराट..