'सकाळ यिन'तर्फे सहा जूनपासून "चला घडूया देशासाठी...'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

जळगाव - "सकाळ डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन' व्यासपीठाच्या माध्यमातून 6 ते 8 जूनदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "चला घडूया देशासाठी...' या वैशिष्ट्यपूर्ण "समर युथ समिट'चे आयोजन करण्यात आले असून, तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या समिटसाठी नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे.

जळगाव - "सकाळ डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन' व्यासपीठाच्या माध्यमातून 6 ते 8 जूनदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "चला घडूया देशासाठी...' या वैशिष्ट्यपूर्ण "समर युथ समिट'चे आयोजन करण्यात आले असून, तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या समिटसाठी नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे.

सध्या महाविद्यालयीन परीक्षा संपल्या असून, उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाईला या सुट्यांचा सदुपयोग व्हावा आणि स्वविकासासोबतच देशासाठी समर्पित भावनेने काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण व्हावी, हा उद्देश शिबिर घेण्यामागचा आहे. सहा ते आठ जूनदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत वेगवेगळ्या सत्रांमध्ये हे शिबिर होईल.

दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात याआधी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आयपीएस विश्‍वास नांगरे- पाटील, हनुमंत गायकवाड, महेश झगडे, वैशाली सामंत, सयाजी शिंदे यांसारख्या दिग्गजांनी तरुणाईला मार्गदर्शन केले आहे. यंदाही शिबिरात राज्यातील विख्यात मार्गदर्शकांसह खानदेशातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

असे आहेत विषय
शिबिरात तीन दिवस विविध सत्रांमध्ये सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रिटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग, सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्ट-अप द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस- आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअर आदी विषयांवर त्या-त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

शिबिरासाठी नावनोंदणी सुरू
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शिबिरात सहभागी होता येईल. निवासी शिबिरात तीन दिवस विद्यार्थ्यांना शिबिर किट, जेवण तसेच शिबिरात सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्थाही विद्यापीठाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. शिबिरासाठी नावनोंदणी सुरू झाली असून, तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क
शिबिरात सहभागी होण्यासाठी "यिन' सदस्यांना दोनशे रुपये, तर अन्य विद्यार्थ्यांना प्रत्येकी चारशे रुपये शुल्क आहे. नोंदणीसाठी "सकाळ' शहर कार्यालय, तिसरा मजला, गोलाणी मार्केट व "सकाळ' एमआयडीसी कार्यालय, जळगाव तसेच समन्वयक बापूसाहेब पाटील (भ्रमणध्वनी ः 9175758630) यांच्याशी संपर्क साधावा. शिबिरात विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व देशासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने तयार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: chala ghaduya deshasathi by sakal yin