चाळीसगावात सायकल चोरणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

चाळीसगाव - शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकली चोरायला लावून, त्यांच्याकडून या सायकली अल्पदरात खरेदी करत त्याची विल्हेवाट लावणारा भामटा चाळीसगाव शहर पोलिसांना सापडला. या प्रकरणी सायकली चोरणारी 2 अल्पवयीन मुले देखिल पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांकडे 30 सायकली सापडल्या आहेत. गोपाळ प्रकाश चव्हाण (हिंगोणे, चाळीसगाव) हा वडाळा येथील प्रवीण संजय बोरसे व अमोल सुनील आमले या अल्पवयीन मुलांना सायकली चोरायला लावत होता. या सायकलींचा तुटपुंजा मोबदलातो विद्यार्थ्यांनी देत होता. त्यानंतर या सायकलींची विल्हेवाट लावण्याचे काम चव्हाण करत होता.

Web Title: In Chalisgaon the cycle thief arrested