Chalisgaon Farmers Rally
esakal
चाळीसगाव: राज्यभर निसर्गाने थैमान घातले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी राजा पूर्णतः मेटाकुटीस आला. आता आपले मायबाप सरकार आपल्याला मदत करीन, या आशेने शेतकरी राजा कर्जमाफीची वाट पाहत आहे. मात्र, सरकारला शेतकऱ्याची नाही, तर व्यापाऱ्यांची चिंता आहे. मी येत्या २८ ऑक्टोबरला नागपूर येथे जाऊन कर्जमाफी घेऊनच वापस येणार हा शब्द शेतकऱ्यांना देतो, असा विश्वास माजी आमदार व बच्चू कडू यांनी रविवारी (ता. ५) येथे व्यक्त केला.