"सकाळ'मुळे धामणगाव झाले जलमय! 

दीपक कच्छवा
सोमवार, 25 जून 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - "सकाळ रिलीफ फंडा'तून धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे एकाच रात्री झालेल्या दमदार पावसात सुमारे सात कोटी लिटर पाणी साचले आहे. "सकाळ माध्यम समूहा'ने समाजहिताच्या केलेल्या या कृतिशील कामाला निसर्गाची साथ लाभल्याने धामणगाव परिसर जलमय झाला आहे. आपल्या परिसरात अथांग पाणी पाहून ग्रामस्थ सुखावले आहेत. या पाण्यामुळे सुमारे पाचशे हेक्‍टर क्षेत्रदेखील ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशा पल्लवित करण्यात "सकाळ'ने लावलेला हातभार सार्थकी ठरल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. 

"सकाळ रिलीफ फंडा'तून व "तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे नाला खोलीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले. आतापर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता. त्यासाठी गावातील प्राप्तिकर आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाणीटंचाई दूर कशी होईल, यावर मार्गदर्शन केले. सर्व ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून त्यांनी जलसंधारणाचे काम हाती घेतले. यासाठी "सकाळ'च्या "तनिष्का' गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. "सकाळ माध्यम समूहा'कडे निधीची मागणी "तनिष्कां'नी केली. येथील पाणीटंचाई लक्षात घेता, "सकाळ रिलीफ फंडा'तून निधी मंजूर करण्यात आला व नाला खोलीकरणाचे काम लगेचच सुरू करण्यात आले. 

पाचशे हेक्‍टरला लाभ 
धामणगावचे एकूण क्षेत्र 971 हेक्‍टर आहे. त्यापैकी पाचशे हेक्‍टर क्षेत्राला नाल्यातील पाणीसाठ्याचा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बळिराजाला "सकाळ रिलीफ फंडा'ची मोलाची साथ लागल्याची बोलकी प्रतिक्रिया उमटत आहे. 

जलसंधारणाच्या व्यापक चळवळीसाठी "सकाळ माध्यम समूहा'कडून केले जाणारे सहकार्य कौतुकास्पद आहे. सात कोटी लिटरचा पाणीसाठा हा एका रात्रीत झाला. पाणी अडविले गेले नसते, तर सात कोटी लिटर पाणी वाया गेले असते. या पाण्यावर पुढील दोन महिने आरामात निघतील. विहिरींनाही चांगली मदत होणार आहे. 
- उज्ज्वलकुमार चव्हाण, प्राप्तिकर आयुक्त, मुंबई 

Web Title: chalisgaon news water Sakal Relief Fund