धनराज माळी : नंदुरबार- गेल्या पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना अखेर विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेनेच्या एकमेव जागेसाठी रघुवंशी यांनाच उमेदवारी दिल्याची घोषणा झाल्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. पर्यायानेच श्री. रघुवंशीच्या आमदारकीमुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यात शिंदे सेनेचे बळ आपसूकच वाढणार आहे.