नाशिक जिल्ह्यात महिलेचा वीज पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

चांदवड (जि. नाशिक) - उर्धूळ (ता. चांदवड) येथे गुरुवारी (ता. 8) झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पावसात अंगावर वीज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. कविता बापू ठाकरे (वय 32) असे या महिलेचे नाव आहे.

चांदवड (जि. नाशिक) - उर्धूळ (ता. चांदवड) येथे गुरुवारी (ता. 8) झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पावसात अंगावर वीज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. कविता बापू ठाकरे (वय 32) असे या महिलेचे नाव आहे.

गुरुवारी उर्धूळसह तालुक्‍यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सायंकाळी 7.30 च्या सुमारास कविता ठाकरे या अंगणातील साहित्य झाकण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन ठाकरे कुटुंबीयांना दिलासा दिला.

Web Title: chandwad nashik news women death by lightning