चौधरींच्या आत्मदहनाचा प्रयत्न यंत्रणेने रोखला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

धुळे - मोराणे (प्र. लळिंग, ता. धुळे) शिवारामधील उपभोगातील हॉटेल आणि जागा अतिक्रमित घोषित करून ती हटविण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेवर आक्षेप आहे. या प्रकरणी न्यायासाठी वेळोवेळी दाद मागूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत तक्रारदार रमेश शंकर चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो पोलिस कर्मचाऱ्यांसह इतरांनी उधळवून लावला. 

संबंधित जागेवर सरासरी २४ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रात १९८५ पासून हॉटेल व स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करीत आहे. यात शेत गट क्रमांक ७/४ क्षेत्रावरील भूखंड २०१३ मध्ये नियमांचे उल्लंघन करून हस्तांतर झाल्याची तक्रार आहे. मात्र, काही सरकारी अधिकारी आणि जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या व्यक्तींनी संगनमतातून जागेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला, अशा आशयाचे निवेदन चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याचे सांगत चौधरी यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांनी चौधरींचा हा प्रयत्न उधळून लावला. त्यांना पोलिसांनी अटक केल्यावर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Chaudhary of the agency restricted to self-combustion